Tuesday, July 25, 2017

गायब सगळं टेंशन ! हसण्याची १०० % हमी ३१ जुलैपासून

GST” नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काही लोकांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण या GST मुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. GST ने सर्वांनाच हैराण केलंहे काय कमी होतं कि आता कलर्स मराठीवर देखील GST लागू होतो आहे. कारणआता प्रेक्षकांसाठी एक अशी एक्सप्रेस सज्ज आहे ज्यामध्ये स्वार झाल्यावर तुम्ही तुमची दु:ख विसरणार हे नक्की. कलर्स मराठी सज्ज आहे GST एक्स्प्रेस घेऊन. GST म्हणजे गायब सगळं टेंशन ही एक्सप्रेस प्रेक्षकांना टेंशन देणार नाही तर त्यांचं टेशन क्षणात दूर करणार आहे. या एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर प्रेक्षकांना चिंतांचा विसर पडणार आहे हे नक्की कारण ही एक्सप्रेस सगळ्यांना १००% हसण्याची हमी देणार आहे. तेंव्हा टेंशन विसरण्यासाठी बघायला विसरू नका कलर्स मराठीवर एक धम्माल विनोदी कार्यक्रम “कॉमेडीची GST एक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते मार्गदर्शकाच्या अथवा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्स याने केली आहेतसेच ज्ञानेश भालेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.

दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देण्याचा हेतू लक्षात घेऊन कलर्स मराठी प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या विनोदविरांना बघायला मिळणार आहे. त्यांची अतरंगी, खुशखुशीत विनोदशैली तसेच त्यांचे बेधडकबिनधास्त विनोद यामुळे प्रेक्षकांना १०० % हसण्याची हमी मिळणार आहे. आशिष पवारकमलाकर सातपुतेकिशोर चौघुले,अदिती शारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे विनोवीर सज्ज आहेत प्रेक्षकांना हसविण्यासाठी आपली एक्सप्रेस घेऊन. या विनोदविरांबरोबर असणार आहेत प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक जे या धम्माल कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. या कार्यक्रमामध्ये काय वेगळेपण असणार आहेहे विनोद सम्राट नक्की काय करणार आहेत कशी धम्माल करणार आहेत हे बघयला या आणि टेंशन फ्री व्हा !

कार्यक्रमाविषयी बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले, “ पहिले गायक मग संगीत दिग्दर्शक त्यानंतर निर्मातासूत्रसंचालकपरीक्षक अश्या अनेक रोलमध्ये मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना भेटलो हे प्रेक्षकचं माझे गुरु आहेत आणि मार्गदर्शक देखील ज्यांनी नेहेमीच मला मार्ग दाखवला आणि मला प्रोत्साहन दिले. आज त्यांच्याच शुभेच्छा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन मी माझा नवीन प्रवास सुरु करतो आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. प्रेक्षकांना हसवणे खूप कठीण असते पण त्याला दाद देणे अगदीच सोपे असते आणि मी यावेळेस हाच सोपा मार्ग स्वीकारला आहे. कलर्स मराठीवरील‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये मी मार्गदर्शकाची भूमिका वठवणार नसून प्रथम प्रेक्षक असणार आहे. मी कार्यक्रमामध्ये असलेल्या विनोदवीरांबरोबर हसणार आहेगाणार आहेत्यांच्या उत्तम विनोदांना दाद देखील देणार आहे. या कलाकारांना मी प्रोत्साहन देणार आहे ज्यामुळे ते सामान्य माणसाला निखळ हसण्याचा आनंद देऊ शकतीलज्यांच्या विनोदाने त्यांना त्यांच्या दु:खाचा विसर पडेल आणि नेहेमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून त्यांना काही मोलाचे क्षण आमचे विनोदवीर या कार्यक्रमातून देतील. कलर्स मराठीचे खूप आभार कित्यांनी मला कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली. मी या कार्यक्रमाबाबत खूपच उत्सुक आहे. आमचा हा कार्यक्रम नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला आशा आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे खुमासदार विनोदांची मेजवानी आणि हसण्याची १००% हमी फक्त कलर्स मराठीवर. तेंव्हा बघायला विसरू नका “कॉमेडीची GSTएक्सप्रेस” ३१ जुलैपासून सोम ते गुरु रात्री ९.०० वा.