नात्यातं प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलही संकंट सहज पार पाडता येतं यावर सरस्वतीने विश्वास ठेवत अनेक अडचणीवर मात केली. या मालिकेला खास करून सरस्वती आणि राघवला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सरस्वती मालिकेचे ५०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या टीमने एकत्र मिळून पार्टी केली ज्यामध्ये मालिकेशी जोडलेला प्रत्येक कलाकार पार्टीमध्ये हजर होता. मालिकेमध्ये आता देविका म्हणजेच जुई गडकरी’ची ची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने सरस्वती आणि राघवच्या आयुष्यात काय बदल होणार आहे ? सरस्वती मालिकाला कुठलं नवीन वळण मिळणार आहे हे बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक असणार आहे.
Bollywood Bubbles posting latest cool interesting news, information, videos, photos, pictures, images of Bollywood actor, actress, movie trailers, hero, heroine, celebrities etc.