बॉलीवूडमधील प्रख्यात गायक कुमार सानू आणि आघाडीच्या गायिका मधुमिता चॅटर्जी यांनी एकत्रितपणे ‘तुम बिन’ हा नवीन अल्बम निर्माण केला आहे. या अल्बमचे प्रकाशन प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि अनुप जलोटा यांच्या हस्ते झाले. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा प्रकाशन समारंभ पार पडला तेव्हा संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या अल्बममध्ये सात अत्यंत दमदार अशी गाणी आहेत जी थेट हृदयाला भिडतात. प्रत्येक गीत आणि त्याच्या संगीतातून प्रेमाचा अविष्कार होतो. त्यात भारतीय माधुर्य आहे आणि पाश्चिमात्य व पारंपारिक लयींचा त्यांना पदर आहे जो रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडतो.
लॉस एंजलीसचे प्रख्यात बोरा काराकास आणि कोलकाता येथील व्हायब्रेशन स्टुडीओचे गौतम बासू या दोघांनी यशस्वीपणे या अल्बमचे ध्वनिमुद्रण केले आहे. या अल्बमच्या संगीताचे मिक्सिंग आणि संकलन ‘स्टुडीओ 208’च्या अलोक पुंजनानी यांनी केले आहे.
या अल्बममधील संजय (बापी) दास यांच्या उत्कृष्ट रचनेची चुणूक आहे. उत्तम गीटारवादक पार्थ पॉल यांचे चाणाक्ष प्रोग्रामिंग श्रोत्याला थक्क करून टाकते. यातील अनोख्या अशा पाच ट्रॅकची संगीत रचना लॉस एंजलीस येथील समीर चॅटर्जी यांची आहे. इतर दोन ट्रॅक हे राजीब चक्रवर्ती आणि सुवोदीप मुखर्जी याचे आहेत.
कुमार सानू आणि त्यांचे कुटुंबीय नुकतेच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहायला गेले होते. समीर आणि मधुमिता हे त्यांना तेथेच भेटले. सानू यांच्या ज्येष्ठ कन्या या भारतीय संगीताचे धडे मधुमिता यांच्याकडून घेतात. मधुमिता यांच्या गझल ऐकल्यावर सानू यांनी एका नवीन अल्बमवर काम करण्याचे ठरवले.
कुमार सानू म्हणाले, “मला खूप आनंद होत आहे की, १९९०च्या दशकातील मधुर संगीताची आम्ही पुनरुक्ती करत आहोत. उत्तम गीते आणि संगीत ‘तुम बिन’च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. हा अल्बम लोकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.”
मधुमिता यांनी म्हटले की बॉलीवूड संगीताचा स्तर घसरला असल्याची बऱ्याचजणांची धारणा आहे. चांगले संगीत आणि उत्तम गीते यांचा अभाव असल्याचे एकूण चित्र आहे. ‘तुम बिन’च्या रूपाने आम्ही भारतीय संगीतातील माधुर्याचा अनुभव परत रसिकांना देत आहोत. यातील गीते हृदयाला भिडतात तर रचना या गीतांना उत्तुग पातळीवर घेवून जातात. त्यातून संगीत रसिकांमध्ये संगीताबद्दल एक नवी अशा निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या.
कुमार सानू हे भारतीय संगीतातील एक आघाडीचे गायक आहेत. बंगाली पार्श्वभूमी असलेले सानू यांनी बॉलीवूडमध्ये १९९० आणि २००० च्या दशकांमध्ये आपल्या आवाजाने धमाल केली होती. त्यांना सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सतत पाच वर्षे फिल्मफेअर पुरस्कार मिळविण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे.. २००९ मध्ये, भारत सरकारने त्यांना त्यांच्या या क्षेत्रांतील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
मधुमिता चॅटर्जी या संगीताच्या क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान असे नाव आहे. १९८९मध्ये त्या अमेरिकेत गेल्या आणि तेथे त्यांनी संगीताचे शिक्षण व लाईव्ह कार्यक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. आज त्यांना भरपूर मागणी असते.
डॉ समीर चॅटर्जी हे संगीतातील चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. ते संगीत रचनाकार आणि रेकोर्डिंग इंजीनियर आहेत. ते कोलकातामध्ये एक व्यावसायिक गीटारीस्ट होते आणि त्यांनी अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांत हेमंत कुमार, रुना लैला, बानी ठाकूर आणि होईमोंती शुक्ला यांचा समावेश आहे. त्यांनी कोलकाता टेलिव्हीजनवर तसेच शहरातील अनेक लोकप्रिय महोत्सवांमध्ये आणि महत्वाच्या ठिकाणी काम केले आहे.
या अल्बमच्या सीडी https://store.cdbaby.com/cd/ma dhumitachatterjee वरून डाउनलोड करता येतील. आयट्युन्स (iTunes), अमझोन (Amazon), सावन (Saavn), स्पोटीफाय (Spotify) आणि इतरही कित्येक भागीदार साइटवरून ती डाउनलोड करता येतील.