Sunday, October 2, 2016

'कौल मनाचा' !! !!

बॉलीवुड स्टार अक्षय कुमार आणि ज्येष्ठ अभिनेत्री डिपल कपाडीया याच्या उपस्थितीत 'कौल मनाचा' या मराठी चित्रपटाचा सगीत प्रकाशन सोहळा सपन्न झाला. जुहू येथील नोव्होटेल या पचताराकीत हॉटेलमधील भरगच्च भरलेल्या सभागृहात पार पडलेल्या सगीत प्रकाशन सोहळ्यात पत्रकाराशी मनमोकळा सवाद साधत अक्षय कुमार आणि डिपल कपाडीया यानी 'कौल मनाचा'चित्रपटाच्या टिमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसगी चित्रपटाचे निर्माते राजेश पाटीलविठ्ठल रुपनवरनरशी वासानीदिग्दर्शक भीमराव मुडेराजेश शृंगारपुरे तसेच इतर कलाकार उपस्थित होते.

'कौल मनाचा' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर अक्षय कुमारने पत्रकाराशी सवाद साधला. 'कौल मनाचा' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाल्याचे अक्षयने म्हटले. सुरुवातीला हिदीत सवाद बोलल्यानतर मराठीत सवाद साधत अक्षयने बालपणी शाळेत घडलेला किस्सा सागितला. शाळेत झालेल्या आपल्या पहिल्या प्रेमाची कबूलीही यावेळी अक्षयने आपल्या सासूबाईंच्या उपस्थितीत दिली. प्रथमदर्शनी 'कौल मनाचाहा चित्रपट लक्ष वेधून घेणारा असून प्रदर्शित झाल्यावर खूप व्यवसाय करो अशी सदिच्छा अक्षयने व्यक्त केली. मराठी चित्रपटाच्या सध्याच्या यशस्वी घोडदौडीवरही अक्षयने आपले मत व्यक्त केल.बॉलिवुडपटाच्या तुलनेत मराठी चित्रपट खूप मोठा असूनबॉलिवुडच्या तुलनेत इथे नुकसान कमी आणि फायदा जास्त असल्याचे अक्षयने म्हटले. 'कौल मनाचा' या चित्रपटाला प्रेक्षकाच्या मनाचा कौल नक्कीच मिळेल अशी आशा डिपल कपाडीया यानी व्यक्त केली. या चित्रपटातील गीत-सगीतही श्रवणीय असल्याच अक्षय कुमार आणि डिपल कपाडीया यानी म्हटले.

 या चित्रपटाची गीते मनोज यादव यांनी लिहिली असून संगीत रोहन-रोहन यांचं आहे. यातील ‘टिक टॅाक’ हे धमाल गीत प्राजक्ता शुक्रे, रोहन प्रधान व रोहन गोखले यांनी गायलं आहे. तर ‘मनमंजिरी’ या प्रेमगीताला अरमान मलिक व श्रेया घोषालचा स्वरसाज लाभला आहे. ‘कौल नियतीशी’ या गीताला आदर्श शिंदेने आवाज दिला आहे.

रेड बेरी एटरटेन्मेटची प्रस्तुती तसेच श्री सदिच्छा फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'कौल मनाचा' या चित्रपटात राजेश शृंगारपुरेसमीर धर्माधिकारीमिलिंद गुणाजी, अमृता पत्की, विजय चव्हाण,जयवंत वाडकरविजय गोखलेवर्षा दांदळेकमलेश सावंतश्वेता पेंडसेआशुतोष गायकवाड,गिरीजा प्रभूनिनाद तांबडेगणेश सोनावणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथाभिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची आहे. नितीन घाग यांनी छायाचित्रणाची व संतोष यादव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा नितीन भावसार व कलादिग्दर्शन संजीव राणे यांच आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनी या चित्रपटाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

रेड बेरी एटरटेन्मेटची प्रस्तुती तसेच श्री सदिच्छा फिल्म्सची निर्मिती असलेला 'कौल मनाचा' हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.