Sunday, October 28, 2012

पुणे ५२ची अशीही स्पर्धा. !.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ' मामि ' चित्रपट महोत्सवात निखील महाजन दिग्दर्शित ' पुणे ५२ ' या बहुचर्चित थ्रिलर सिनेमाचा वर्ल्ड प्रीमिअर पार पडला. या निमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एका छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या स्पर्धकांसाठी पाऊस , गुपित , थरार-क्षण , रात्र , मोहाचा क्षण या पाच विषयांपैकी कोणत्याही एका विषयाशी संबंधित जास्तीत जास्त दोन छायाचित्र amarapte52@gmail.com या इ-मेल वर पाठवायची आहेत. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षीसही मिळणार आहेत. दिग्दर्शक गोविंद निहलानी , सिनेमेटोग्राफर महेश लिमये या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. २२ नोव्हेंबर ही या स्पर्धेत आपली छायाचित्र सबमिट करण्याची अंतिम तारीख असेल , अशी माहिती सिनेमाचे निर्माते उमेश कुलकर्णी यांनी दिली.