Friday, September 7, 2012

``MIFTA MAHOTSAV``-AN AFFAIR TO REMEMBER !

तमाम मराठी मनोरंजन विश्वाच्या अस्मितेचा केद्र बिंदू असलेल्या मिफ्ता महोत्सवाचे चे पडघम ठाण्यात सर्वत्र घुमू लागले आहेत.या मिफ्ता महोत्सवाचे  आयोजन ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले असून दिनांक २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री .उद्धवजी ठाकरे याच्या हस्ते करण्यात आले.मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मान्यवर परीक्षकांनी तसेच रसिक  प्रेक्षकांनी निवड  केलेल्या दहा नाटके तसेच दहा चित्रपटाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.
याच बरोबर मिफ्ता जल्लोष नावाच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक  ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ४ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.या कार्यक्रमात मनोरंजनाची एक आगळी वेगळी भेट रसिकांना मिळणार आहे ,सदर कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे .
४ सप्टेंबरला सुरु झालेल्या या मिफ्ता जल्लोष कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी , उर्मिला कानेटकर - कोठारे ,मानसी नाईक ,क्रांती रेडकर आणि गौरी इंगवले यांनी लावण्या सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पटवर्धन यांनी केले.  
तर ५ सप्टेंबरला झालेल्या फु बाई फुल २ या कार्यक्रमात वैभव मांगले,पुष्कर श्रोत्री , आनंद  इंगळे ,प्रदीप पटवर्धन ,भाऊ कदम ,प्रभाकर मोरे ,सुनील जाधव ,तृप्ती खामकर ,आशिष राणे,नुपूर दुधवाडकर,संदीप रेडकर या कलाकारांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना हसवून त्यांची मने जिंकली.फु बाई फ़ुल २ या कार्यक्रमाचे लेखन राजेश देशपांडे यांनी केले होते.
रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
दिनांक ९ सप्टेंबर रोजी या संपूर्ण महोत्सवाची सांगता होणार असून "सिनेमा नावाचा माणूस" व्ही .शांताराम  या एका वेगळ्या कार्यक्रमाने होणार आहे.ज्यामध्ये अवधूत गुप्ते ,स्वप्नील बांदोडकर ,अजित परब ,श्रीरंग भावे ,केतकी भावे ,मधुरा कुंभार याचे सुश्राव्य संगीत आपल्याला ऐकता येणार असून सोनाली कुलकर्णी , उर्मिला कानेटकर - कोठारे ,मानसी नाईक,नेहा पेंडसे ,मृण्मयी देशपांडे याच्या नृत्याची अदाकारी आपल्याला पाहता येणार आहे,या कार्यक्रमच्या सूत्रसंचालनाची धुरा सुबोध भावे,सचिन खेडेकर,प्रसाद ओक  हे सांभाळणार आहेत.या कार्यक्रमाचे दिग्दर्शन राहुल रानडे यांचे असून
सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री उद्या ( ७ सप्टेंबर ) पासून नाट्यगृहावर होणार असून तिकीट दर हे रु.१०० , ७५ , ५०  आहेत . 
म्हैसकर फाऊडेशन चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना श्री.महेश मांजरेकर यांची आहे.
Posted By RASRAJ