मुंबई १२ सप्टेंबर २०१२ ;
प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी ,उत्तुंग ठाकूर
यांची विवा इन आणि रवी जाधव फिल्म्स ची संयुक्त निर्मिती असलेल्या बीपी (
बालक पालक) चित्रपटाची आज एका पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली
या वेळी रितेश देशमुख ,उत्तुंग ठाकूर ,रवी जाधव यांच्यासह किशोर कदम
,सई ताम्हणकर ,प्रथमेश परब ,शाश्वती पिंपळीकर,मदन देवधर ,भाग्यश्री सकपाळ
,रोहित फाळके ,सुबोध भावे ,अमृता सुभाष ,अविनाश नारकर ,विशाखा सुभेदार
,आनंद इंगळे ,सतीश तारे ,सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते .मुंबई
फिल्म कंपनी आणि विवा इन या संस्थेद्वारे श्री .रितेश देशमुख आणि उत्तुंग
ठाकूर चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहेत.
हल्ली पौगंडावस्थेतल्या मुलांचा लैंगिक शिक्षणाबद्दल पालकांबरोबरच संवाद
जवळपास खुंटला आहे .मात्र या मुलांचा बाहेरील जगाशी अश्लील गोष्टींशे
संपर्क येत असतो .त्यामुळे पालक आणि मुलांमधील नात्यात या विषयाबद्दल संवाद
होण्याच्या दृष्टीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
चित्रपटाची
पटकथा ,कथानकामधला आशय आणि त्याला मिळालेली ट्रीटमेंट चांगली असेल तर या
चित्रपटाकडे मी आकर्षित होतो.बीपी चित्रपटातला आशय मोठ्या
प्रेक्षकवर्गापर्यंत पोचणे आवश्यक होते .या चित्रपटाच्या भाषेचे बंधन नसून
तो सगळ्यांना आवडेल असा आहे.तसेच या चित्रपटाचा विषय म्हणजे देशभरच्या
प्रत्येकासाठी वास्तवच आहे .त्यामुळे या चित्रपटाशी मी जोडला गेलोय त्याचा
मला आनंद आहे .प्रेक्षकवर्ग या चित्रपटाशीही जोडला जाईल आणि त्याचा आनंद
घेईल अशी इच्छा मी व्यक्त करतो ,असे रितेश देशमुख म्हणाले.
चित्रपटाची पटकथा ,कथानकामधला आशय आणि त्याला मिळालेली ट्रीटमेंट चांगली
असेल तर या चित्रपटाकडे मी आकर्षित होतो.बीपी चित्रपटातला आशय मोठ्या
प्रेक्षकवर्गापर्यंत पोचणे आवश्यक होते .या चित्रपटाच्या भाषेचे बंधन नसून
तो सगळ्यांना आवडेल असा आहे.तसेच या चित्रपटाचा विषय म्हणजे देशभरच्या
प्रत्येकासाठी वास्तवच आहे .त्यामुळे या चित्रपटाशी मी जोडला गेलोय त्याचा
मला आनंद आहे .प्रेक्षकवर्ग या चित्रपटाशीही जोडला जाईल आणि त्याचा आनंद
घेईल अशी इच्छा मी व्यक्त करतो ,असे रितेश देशमुख म्हणाले.
निर्माते
उत्तुंग ठाकूर म्हणाले,पालक आणि मुलांमध्ये एक मनमोकळी आणि सशक्त चर्चा
होण्यासाठी बीपी चित्रपट प्रोत्साहित करणार आहे.बॉलीवूडमधील व्यावसायिक
चित्रपटाबरोबरच विवा इन हि आमची संस्था बीपी सारख्या वेगळ्या विषयांवरील
चित्रपटांची निर्मिती करणार आहे.बीपी मधला विषय जरी गंभीर असला तरी तो
अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे .आपल्या मुलांशी कशा
पद्धतीने संवाद साधायला हवा ,याची पालकांना कल्पना हा चित्रपट पहिल्यानंतर
येणार आहे.
जाहिरात क्षेत्रामध्ये मोठे नाव कमाविणारे रवी जाधव हे स्वतः उत्तम ग्राफिक
डिझायनर असून कल्पक कॉपीरायटर ही आहेत.वेगवेगळ्या कल्पनांवर आधारलेल्या
त्यांच्या जाहिरातींनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत .वेगवेगळ्या
विषयांना मोठ्या पडद्यावर आणण्याचा ध्यासच सध्या त्यांनी घेतला आहे .श्री
.रवी जाधव म्हणाले '' बीपी हा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक विषय
होता.बर्याचदा आपण मुलांशी बोलणे टाळतो.काही वेळा आपण मुलांच्या प्रश्नांना
उत्तरे देतो.काही प्रश्नांची उत्तरे देताना आपण त्यांच्यावर ओरडतो किवा
काहीवेळा त्यांच्यावर आपला हातही उठतो.परंतु बहुतेकवेळा आपण त्यांच्या
प्रश्नांची उत्तरे देत नाही .बीपी हा चित्रपट म्हणजे एक हलकेफुलके नाट्य
आहे.या नात्यातून प्रेक्षकांना आपल्या मुलांशी कसा संवाद साधायला हवा हे
समजणार आहे.हा चित्रपट प्रेक्षक म्हणून मला पाहताना मजा येतेय .परंतु तो
पडद्यावर साकारताना खूप कठीण होता.
बीपी चे आणखीन एक मोठे वैशिष्ट म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात संगीतकार
जोडी विशाल - शेखर यांनी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
केले आहे ."करूया आता कल्ला" आणि "हरवली पाखरे" ही दोन गाणी मराठी चित्रपट
संगीत क्षेत्रात धमाल उडवणार.
बीपी (बालक पालक ) चित्रपटाबद्दल;
पौगंडावस्थेतील मुलांच्या लैंगिक
समस्यांवर हा चित्रपट आधारला आहे.समाजातील खूप कमी पालक या विषयाबद्दल
आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असतात.याबाबत मुलांकडून आलेल्या
प्रश्नांना पालकांकडून एकतर धुडकावले जाते किंवा त्याबद्दल त्या मुलावर
रागही काढला जातो.बीपी हा चित्रपट म्हणजे अव्या , भाग्य ,चिऊ ,आणि डॉली या
पौगंडावस्थेतील चौघांची कहाणी आहे.आपल्या कॉलनीमधील ज्योतीताईने घर
सोडल्याची माहिती त्यांना कळते.आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याच्या
कारणावरून ज्योतीताईला आपले घर सोडावे लागले असते.याबाबत या चौघानाही
आपापल्या पालकांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत .तेव्हा ज्योतीताईच्या
घर सोडण्यामागचे कारण शोधण्याचे आव्हान स्वीकारतात.याचवेळी त्यांची भेट
होते ती विष्णूबरोबर.हा विष्णू त्यांच्यापेक्षा मोठा असतो .ब्ल्यू
चित्रपटांच्या काही गोष्टी करायला हव्यात ,असे तो त्यांना सांगतो.
रवी जाधव यांच्याबद्दल ; बीपी हा रवी जाधव यांचा दिग्दर्शक म्हणून तिसरा
चित्रपट आहे.या पूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या
दोन चित्रपटांनी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळवले तसेच बॉक्स
ऑफिस वरही मोठी लोकप्रियता मिळवली.नटरंग हा महाराष्ट्रातल्या लोककलेवर
आधारलेला होता तर बालगंधर्व मध्ये एका रंगभूमीवरील सम्राटाचे आयुष्य
दाखविण्यात आले होते.हे दोन्ही चित्रपट आशय आणि हाताळणीच्या बाबतीत खूप
वेगळे होते
उत्तुंग ठाकूर यांच्याबद्दल ; न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी
मधून चित्रपट निर्मिती आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन श्री .उत्तुंग ठाकूर
भारतात परतले आहेत .मुंबई विद्यापीठाचे ते बीएमएम चे विद्यार्थी
आहेत.दारूच्या व्यसनावर त्यांनी एक लघुपट बनविला आहे. "बीपी" हा त्यांचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे
Posted By RASRAJ