आपल्या आईच्या स्मरणार्थ एका भक्तीगीताच्या अल्बम सोबतच सामाजिक आणि शैक्षणिक
कार्यासाठी धर्मादाय संस्थेची स्थापना करून एक नवा आदर्श निर्माण करणारा सोहळा
नुकताच जुहू स्कीम पार्ले येथील प्रसिद्ध भाईदास सभागृहात समस्त बुरांडे
कुटुंबीयांनी आयोजित कार्यक्रमात पहायला मिळाला. या प्रसंगी स्वरचंद्रिका पद्मश्री
पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्या अलौकिक रचनांनी सजलेल्या 'आनंदमूर्ती' या
ऑडिओ सीडीचे
प्रकाशन भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या शुभहस्ते आणि खासदार एकनाथ गायकवाड, माजी
नगरपाल जगन्नाथ हेगडेवार, कोळी समाजाचे नेते नामदेव भगत, भजन सम्राट महादेवबुवा
शहाबाजकर, गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर, विलास बुरांडे, तुलसी बुरांडे, आणि इतर
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्यासोबत मंदार पारखी आणि
मनोज देसाई यांनी 'आनंदमूर्ती' ह्या ऑडिओ सीडीतील भक्तिगीतांच्या रचनांसाठी योगदान दिले आहे.
