विनिता क्रिएशन्सची निर्मिती तसेच मिलिंद देविदास पाटील यांच्या एचडी मुव्हीजची प्रस्तुती असलेल्या 'योगायोग' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे ७ दिवसाचे पहिले शेड्युल नुकतेच महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले.
'योगायोग' या व्याख्येत अगदी फिट बसत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत राज आणि प्रशांत शिंदे करत आहेत. अंकुश चौधरी या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असून सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सिया पाटील या सिनेमात मुख्य भूमिकेत असून दिपक शिर्के, विजू खोटे, विकास समुद्रे, अंजली उजवणे, ज्योत्सना आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा बी. राज यांची असून पटकथा साईदास यांनी लिहीली आहे. शिरीष लाटकर यांनी चित्रपटाचे संवाद लिहीले आहेत. जाफर सागर यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार्-महेश ही जोडी संगीतबद्ध करणार आहे. दक्षिणेकडील सुप्रसिद्ध कॅमेरामन रामजी यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. कमलेश मौर्या या सिनेमाचे कार्यकारी निर्माता आहेत, तर शेखर नागवेकर प्रॉडक्शन डिझाइनर. क्रिएटिव्ह हेड साजना सरगम असून सुंदर शेट्टी संकलनाची बाजू सांभाळणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसर्या शेड्युल्डची सुरुवात होणार आहे.