महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विवियाना मॉलच्या एक्स्ट्राऑर्डिनारी साजरा करीत आहेत आपल्यासारख्याच दिसणा-या (#Justlikeus) व्हीलचेअरवरच्या काही सक्षम सूपरवुमन्स
• व्हीलचेअरवरील स्त्रियांना एकसमान रोजगार संधी, प्रवेश आणि आदर मिळवून देण्यासाठी स्वाक्षरी अभियानाचा आरंभ
• व्हीलचेअरवरील लोकांसाठी खरेदीमध्ये सहयोगासोबत व्हीलचेअरसाठी सुलभ असलेल्या ट्रायल रुम्स विकसीत करण्याचे धेय्य
• व्हील चेअरवरील पुरुष आणि स्त्रियांसाठी हाताळण्याजोगे वातावरण तयार करण्याचा एक प्रयत्न म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाला या वर्षाखेरपर्यंत व्हीलचेअर सुलभ बनवण्याचे धेय्य
• फॅशन शो, गाणी आणि नृत्याविष्कार सादर करणा-या स्त्रियांनी प्रेक्षकांना त्या अगदी आपल्या सारख्याच आहेत हे सिध्द करत मंत्रमुग्ध केले.
• विवियाना मॉल त्यांच्या एनजीओ सहयोग्यांसोबत व्हीलचेअरवरील स्त्रियांसाठी रोजगार समर्थन कार्यक्रम सुरु करणार
मुंबई ७ मार्च २०१९: विवियाना मॉल या भारताच्या आघाडीच्या मॉलचा “रोजचा दिवस साजरा करण्यावर” ठाम विश्वास आहे. प्रत्येक ग्राहकाला अभुतपूर्व अनुभव देण्याच्या आपल्या वचनाला सत्य करत, विवियाना मॉलने अतिशय आगळ्यावेगळ्या पध्दतीने व्हीलचेअरवरील स्त्रियांच्या प्रतिभांना साजरे केले. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सर्वसमावेशक वातावरण तयार करण्याचा वास्तववादी प्रयत्न म्हणून विवियाना मॉलने आपल्या कार्यक्रमाच्या “एक्सट्राऑर्डिनारी” या मंचामार्फत हा महिला दिन साजरा केला आणि व्हीलचेअरवर वावरणा-या स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली. नीना फाउंडेशनच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जीवनाच्या विविध टप्प्यांमधल्या व्हीलचेअरवरच्या स्त्रियांनी नृत्य, व्हीलचेअरवरील साहसी कृत्ये आणि फॅशन शोच्या माध्यमाने आपल्यामधली क्षमता जगासमोर सादर केली. प्रेक्षक दाखवल्या गेलेल्या प्रतिभांमुळे अतिशय मंत्रमुग्ध झाले, साहजिकच या प्रदर्शनांच्या मार्फत व्हीलचेअरवरील स्त्रिया देखील आपल्यासारख्याच आहेत (#just like us) हा संदेश सर्वांपर्यंत अगदी सहजपणे पोहचवला गेला.
व्हीव्हीयाना मॉलच्या प्राधिकरणाला हे जाणवले की हालचाल करण्यास त्रास होणा-या स्त्रियांना बरेचदा कमी लेखले जाते. या समस्येला विचाराधीन घेऊन विवियाना मॉलने महिला दिनाच्या सायंकाळी #RespectWomenonWheelChair अभियान सुरु केले ज्यामुळे या स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास त्याचप्रमाणे समाजामध्ये त्यांच्या सुदृढ लोकांप्रमाणे असलेल्या क्षमतेबद्दल सजगता निर्माण करण्यास मंच उपलब्ध झाला.
या प्रसंगी बोलताना वरीष्ठ उपाध्यक्ष मार्केटिंग सुश्री रीमा प्रधान म्हणाल्या,”एक्स्ट्राऑर्डिनारीच्या मार्फत आमचा समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मंच स्थापन करण्याचा उद्देश आहे. या वर्षी #RespectWomenonWheelChair च्या माध्यमाने आम्ही व्हीलचेअरवरील लोकांबद्दल खासकरुन स्त्रियांच्या समस्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे धेय्य बाळगले आहे. हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे की, व्हीलचेअरवरील स्त्रिया देखील कार्यस्थळांवर आणि विस्तिर्ण समुदायांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावण्याची कुवत बाळगतात. त्यांच्यामार्फत आपल्या समाजाला दिल्या जाणा-या योगदानाला आणि मूल्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पण हे तेव्हाच समजून घेता येईल जेव्हा आपण एकत्र येऊन काम करु आणि एकसमान, सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करु, जिथे या लोकांना स्वतंत्र बनवण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, ज्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार एकसमानपणे हाताळण्यास मिळतील आणि त्यांच्या आत्मविश्वासाला उभारी मिळेल.”
या प्रसंगी नीना फाउंडेशनच्या संस्थापक आणि ट्रस्टी डॉ. केतना एल. मेहता यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. नीना फाउंडेशन आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित पाठीच्या कण्याचे आजार असलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करते. .
सुश्री विराली मोदी देखील या प्रसंगी उपस्थित होत्या, त्या अपंगत्वाच्या अधिकारांसाठी काम करतात आणि व्हीलचेअरवरील लोकांसाठी रेल्वेला अधिक सुकर वनवण्याच्या अभियानात त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. डॉ. केतना आणि सुश्री विराली यांनी उपस्थित असलेल्या श्रोतेवर्गाला आपले अनुभव सांगितले आणि कार्यक्रमाची प्रेरणादायक स्वरुपात सांगता केली.
या वर्षी एक्स्ट्राऑर्डिनारीने स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली आहे ज्यामध्ये व्हीलचेअरवरील स्त्रियांना एकसमान, सर्वसमावेशक आणि आदर देणा-या वातावरणाची निर्मिती करण्यासाठी समर्थन दिले जाणार आहे, हे अभियांन महिला दिनाच्या वीकएंडपर्यंत सुरु राहणार आहे. विवियाना मॉल या उपक्रमात अधिकाधिक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा करीत असून लोकांना मॉलला भेट देण्यामार्फत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे.