Thursday, January 10, 2019

                "नूतन आणि वहिदा"

स्वर्गीय सौंदर्य आणि संयत अभिनयाने भारतीय सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या "नूतन आणि वहिदा" या अभिनेत्रींनी हिंदी रुपेरी पडदा गाजवला. या गुणी अभिनेत्रींच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकॅडमी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१२ जानेवारी रोजी मिनी थिएटररविंद्र नाट्यमंदिरप्रभादेवी येथे रात्रौ ८.०० वाजता "नूतन आणि वहिदा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात या दोन्ही शालीन अभिनेत्रींच्या अभिनय कारकिर्दीचा आढावा अनोख्या रूपात घेतला जाणार आहे. सोबत राधिका फणसे आणि सहकारी नृत्यरूपाने ह्या नायिकांना मानवंदना देणार आहेततसेच दोन्ही अभिनेत्रींवर चित्रीत झालेल्या काही गाण्यांची झलक दृकश्राव्यातून रसिकांना पहायला मिळणार आहे. या  कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन प्रसाद फणसे यांची आहे. ज्येष्ठ पत्रकार व हिंदी सिनेसंगीताचे गाढे अभ्यासक श्री. अंबरीश मिश्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.
हा कार्यक्रम सशुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर आहे.