Wednesday, November 7, 2018

व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट १६ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडोमैत्र जीवांचे... हे दोन जीवांचे मैत्र... मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि प्राणी असेल.... वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये वेगवेगळे चित्रपट केले जातात मात्र मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट पहायला मिळणं तसं दुर्मिळच. मात्र आता प्राणीप्रेमावर आधारलेला अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित व्हॅनिलास्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट हा मराठी चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे.
निसर्गरम्य माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणारे बाबू पवार त्यांची पत्नीमुलगा चिनूमुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात व्हॅनिलाचं आगमन होतं. या कुटुंबाची व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. माथेरानमधल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी मुलगी आणि त्याच शाळेच्या आवारात राहणारी ‘व्हॅनिला’या दोघींच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. व्हॅनिला’ आणि तेजू यांच्या सुरेख नात्याची गुंफण दाखवतानाच मुक्या जीवांच्या रक्षणाचा मुद्दा हा चित्रपट अधोरेखित करतो. चित्रपट माध्यमातून हा मुद्दा ठळकपणे समाजापुढे येईल या उद्देशाने या चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ सांगतात.  
या चित्रपटाची खासियत म्हणजे माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा पहिलाच चित्रपट आहे. माथेरानची भौगोलिक परिस्थिती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी कोणतेही वाहन नेण्यास मज्जाव आहे त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण हे संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. चित्रीकरणाच्यावेळी व्हॅनिटी व्हॅन तर सोडाच पण चित्रीकरणस्थळी जाण्यासाठीही कलाकार व तंत्रज्ञांना पायी चालत जावे लागायचे, तरीही हे आव्हान टीमने पेललं आणि यशस्वीरित्या चित्रीकरण पूर्ण केलं.
या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक गिरीश विश्वनाथ आणि त्यांची लेक अभिनेत्री जानकी पाठक चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथापटकथासंवादगीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नवोदित अभिनेत्री जानकी पाठकरवी काळेराजश्री निकमराधिका देशपांडे,क्षितीज देशपांडेविनोद जाधव या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी आहेत. संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अलीउपग्ना पंड्याऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे.
१६ नोव्हेंबरला व्हॅनिलास्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.