Thursday, January 25, 2018

"अनन्या" चा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग

सुयोग निर्मित "अनन्या" नाटकाचा २५ वा रौप्य महोत्सवी प्रयोग आज दीनानाथ नाट्यगृहात साधार करण्यात आला. या वेळी नाटकाचे  लेखक दिग्दर्शक प्रताप फड, निर्माते राजेश पाटील, श्रीमती कांचन, सुधीर भट, प्रताप फड उपस्थित होते. 
अनन्या हे पारिवारीक नाटक असून नायिकेच्या आपघातानंतर तिचंआयुष्य कलाटणी घेतं. यानंतर जीवनातील वास्तविकता, तिची नोकरी मिळविण्याची जिद्द व वडिलांची असलेली माया या सगळ्यांची घालमेल सहन करत नायिका जिद्दीने आपला जीवनाचा प्रवास करते.  ही तरुणी आयुष्याच्या वळणावर उभ्या ठाकलेल्या संकटाला जिद्दीने तोंड देत परिस्थितीला सामोरे जाते. मनात असेल तर काहीही अश्यक्य नाही, याचे मूर्तिमंत उदहारण या नाटकांतून दाखवण्यात आले आहे. 
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी अतिशय उत्तम रीत्या केले आहे. तरुण कलावंतांची सक्षम टीम 'अनन्या'ला लाभली आहे. ऋतुजा बागवे हीने तिचं उल्हसित होणं, खचणं, भरारी घेणं, आत्मविश्वास मिळवत उभं राहणं ह्या अवस्थांतरासाठी आवश्यक असलेले आवाजातले बदल, शब्दफेक, नजरेचा वापर संयमाने केला आहे त्यामुळे अनन्याच्या भूमिकेला ऋतुजाने योग्य न्याय दिला आहे तसेच प्रमोद पवार यांनी बाबांची भूमिका साकारताना संवेदनशीलतेच प्रत्यय आणून दिला आहे. संदेश बेंद्रे यांचे प्रसन्न नेपथ्य नाटकाला सौंदर्य बहाल करते 
या नाटकाचे निर्माते राजेश पाटील, श्रीमती कांचन, सुधीर भट, प्रताप फड असून लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले  आहे. नाटकाचे कलाकार प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, अजिंक्य ननावरे, सिद्धार्थ बोडके आणि ऋतुजा बागवे आहेत. 
प्रताप फड या युवा लेखक व दिग्दर्शक काही वर्षांपूर्वी "अनन्या" ही एकांकिका स्पर्धेतून सादर केली होती. त्यावेळी ती प्रचंड गाजली त्यामुळे या एकांकिकेवरून नाटक बनवताना लेखक म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती ती यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पडली आहे.

सीरियलमधून एखाद्या कलाकाराला फारसा वाव मिळत नाही कारण कथेच्या व इतर पात्रांशी साधल्या गेलेल्या भूमीका करताना मर्यादा येतात.पण भूमिका तगडी असेल तर कलाकार न्याय देऊ शकतो.अशीच एक अनन्य साधारण भूमिका ऋतुजा बागवे जागलीया. सध्या चालू असलेल्या अनन्य नाटकात. तशी सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत.प्रमोद पवारसारखे जुने जाणते कलाकार.एकंदरच ही भट्टी छान जुळून आलीय. अनन्या च्या वाढदिवस साजरा करताना तिच्या पायावर केक ठेऊन तो केक तिचा भाऊ खातो असे कित्येक प्रसंग मनाला चटका लावून जातात. सिद्धार्थ बोडके हा अतिशय गुणी कलाकर आहे.प्रॉमिसिंग आहे. तो दोन घटका वातावरण हलके करतो पण रंगमंच उजळून टाकतो तेव्हा ह्या अद्वितीय आणण्याला त्रिवार सलाम