Monday, December 4, 2017

"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" !!

पद्मश्री डॉतात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावरदृष्टिक्षेप टाकणारा "डॉतात्या लहाने | अंगार... पॉवर इज विदीनया चित्रपटाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतच चाललाय. अश्या या चित्रपटाच्या गाण्याचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सिटी लाइटबँक्वेट्स माहीम (पश्चिम) येथे करण्यात लायावेळी मकरंद अनासपुरेअलका कुबलडॉनिशिगंधावाडसाधना सरगमचित्रपटाचे दिग्दर्शक  निर्माते विराग मधुमालती वानखडेसहाय्यक निर्मात्यावंदना वानखडे, चित्रपट सादरकर्ते रीना ग्रवाल, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया ई. मान्यवरउपस्थित होतेचित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमनोंदविलेल्या 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू'  या गीताचे साधना सरगम आणि विरागयांनी सादरीकरण करून आनंद द्विगुणीत केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात व खेड्यापाड्यात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बुकिंग केले आहे. लायन व रोटरी क्लब तर्फे देखील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रम शाळांना या चित्रपटाचा लाभ घेता यावा म्हणून ग्रुप बुकिंग ची मागणी केली आहे.
"डॉतात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीनहा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मितअसून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेहा चित्रपट डॉतात्या लहानेयांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीयशिक्षण पूर्ण केले  या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तसेच त्यांच्या आईनेस्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांना पुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्णसंदेशही यातून दिला आहेडॉलहानेंचा ध्यासकष्टसंघर्ष  त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथएकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेतडॉतात्या लहानेयांची ही "बायोपिकआजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहेहा चित्रपट समाजालानवीन दिशा  विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य  प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास चित्रपटाच्या विशेष सादरीकरणानंतर समाजातील प्रत्येक घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविलाअसून 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू'... हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगमआणि विराग यांनी स्वतः गायले आहे“का रे माझ्या मना छळतोस तू मला” हे तात्यारावांच्या जीवनातील अनेक उतार चढाव दर्शविणारे गीत  केतकी माटेगावकर व विराग यांच्या आवाजात आहे.तसेच त्यांच्या बालपणीचा कठोर संघर्ष व त्यांची जिद्द  “झाले घाव जरी काळजा तरी..हूर हूर ना आता या जीवा” या गीताद्वारे मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत “एक हिंदुस्तानी” नामक संगीतकाराने दिले असून त्यांनी आपले नाव गुपित ठेवून तात्यांच्या कार्याला आपल्या संगीताद्वारे मानवंदना दिली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत समीर – सचिन यांचे असून विराग मधुमालती व राहुल साळवे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत.  
या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉलहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असूनअलका कुबल ह्यात्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेतडॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाडअसून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.