Saturday, December 2, 2017

‘हॉस्टेल डेज’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन संपन्न !!- कुमार शानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, सोनू निगम, बेला शेंडे आणि अवधूत गुप्ते यांचा आवाज !!

हॉस्टेल डेज’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील गाणी कुमार सानूशंकर महादेवनसोनू निगमशानकुणाल गांजावालाबेला शेंडेअवधूत गुप्ते आदी बॉलीवूडमधील दिग्गजानी गायली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पार्श्वगायक मराठी चित्रपटात गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. या ख्यातनाम गायकांनी गायलेल्या या गाण्यांमुळे वेगळ्या विषयावरील या चित्रपटाबद्दची रसिकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा समारंभ ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. या चित्रपटाचे संगीत प्रकाशन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार शानूशानकुणाल गांजावालाबेला शेंडे, अवधूत गुप्ते आणि दिग्दर्शक व संगीतकार अजय नाईक यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत करण्यात आले. 
हिंदीतील या पार्श्वगायकांबरोबरच प्रियांका बर्वेआनंदी जोशीरुचा बोंद्रे या नव्या दमाच्या गायक कलाकारांचीही गाणी या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि आघाडीचे लेखक अजय नाईक यांनीच या चित्रपटाला संगीत दिले आहे. 'हॉस्टेल डेज'मध्ये प्रार्थना बेहेरेआरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या संगीत प्रकाशनसमयी गायक कुमार शानू म्हणाले की ‘या चित्रपटात गाणे गायला मला खूप मजा आली आणि ह्या चित्रपटाचे संगीत सगळ्यांना नक्कीच आवडेल. अजय नाईकनी चित्रपटातील सर्व गाण्यांना खूप सुंदर संगीत दिले आहे’. कुणाल गांजावाला यांनी म्हटले की ‘अजय हा एक हुशार दिग्दर्शक, लेखक व उत्तम संगीतकार सुद्धा आहे. या चित्रपटातील गाणी तरुणाईला वेड लावतील,. गायक शान यांनी सांगितले की ‘मी चित्रपटात जे गाणे गायले आहे, त्या गाण्यामुळे मला हॉस्टेलची मजा अनुभवायला मिळाली. अजयच्या या चित्रपटाला मी शुभेच्छा देतो, व सर्वांनी हा चित्रपट सिनेमागृहात येऊन नक्की पहावा’.    
या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती सुभाष बोराचंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग ह्यांच्या श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने झाली आहे.
चित्रपटाची कथा १९९०च्या दशकातील आहे. एका हॉस्टेलमध्ये ती १९९४ मध्ये आकाराला येते. आता ते दशक म्हणजे एकापेक्षा एक उत्तम संगीत आणि मातब्बर गायकांनी गाजवलेला असा तो काळ होता. म्हणजेच या चित्रपटातील गाणीही तेवढीच ताकदीची आणि कर्णमधुर असणे गरजेचे होते. ही सुप्त इच्छा फलद्रूप झाली आणि चित्रपटासाठी कुमार शानूशंकर महादेवनशान, सोनू निगम, कुणाल गांजावालाबेला शेंडेअवधूत गुप्ते यांनी गाणी गायली.
ही कथा आहे १९९४ मधीलसाताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची. १९९० च्या या दशकात एकापेक्षा एक अफलातून गाण्यांचा जन्म झाला. कुमार  सानूशंकर महादेवनसोनू निगमशान या दिग्गजानी हे दशक अक्षरशः गाजवले. 'हॉस्टेल डेज'ची गाणी करताना हा सुवर्णकाळ रसिकांना पुन्हा आठवून देण्याची इच्छा होती. या दिगज्जांनी या प्रयत्नात त्यांचा सहभाग नोंदवावाअसेही वाटत होते. ही इच्छा प्रत्यक्षात उतरली आणि हे सर्वच गायला तयार झाले.
चाली बांधताना आणि त्या चालींची शब्दरचना करताना १९९० चे दशक डोळ्यांसमोर होते. कुमार सानूजीं ची अनेक गाणी१९९८ मध्ये ब्रेथलेस’ या गाण्याने धमाल उडवून देणारा शंकर महादेवन१९९३ साली अच्छा सीला दिया तूनेया गाण्याने रसिकांना वेड लावणारा सोनू निगम, ‘मुसु-मुसुने १९९९ साली धमाल करणारा शान, १९९८ साली सारेगामा जिंकणारी बेला शेंडे....सर्वकाही अवर्णनीय होते. हे सर्वच महान गायक हॉस्टेल डेजच्या गाण्यामध्ये आहेत,” असे उद्गार चित्रपटाचे लेखकदिग्दर्शकसंगीत दिग्दर्शक अजय किशोर नाईक यांनी काढले. चित्रपटाचे संगीतरचना आणि व्यवस्थाही अजय किशोर नाईक यांची आहेतर गीते गुरु ठाकूरअजय किशोर नाईकमंदार चोळकर यांची आहेत. नितीन जोशी यांनी मिकसींगख्रिस ग्रॅहम यांनी अमेरीकेत मासटरींग केले आहे. स्वराधीश,ऑडीओ गॅरेजसाना स्टुडीओपर्पल हेजसाऊंड आयडीयाज येथे या गाण्यांचे ध्वनिमुद्रण झाले आहे.
यातील हॉस्टेलची दुनियादारी’ हे गाणे कुणाल गांजावाला यांनी गायले आहे तर दुनिया रंग रंगीली’ शानच्या आवाजात आहे सभोवती तुझे हसू’ हे गाणे कुमार शानू व बेला शेंडे यांचे आहे. चला रेनाचू गाऊ’ हे आनंदी जोशी,प्रियांका बर्वे आणि रुचा बोंद्रे यांच्या आवाजात आहे. सोनू निगम यांनी हात सुटले नाते तुटले’ हे गाणे गायले असून शंकर महादेवन यांनी मैत्री’ हे गाणे गायले आहे. अवधूत गुप्तेने टीरींग टीरींग मध्ये धमाल केली आहे.
"हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाहीत्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणी हि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार अजय नाईक यांनी काढले.
ते पुढे म्हणाले कीकॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.
चित्रपटाचे निर्माते सुभाष बोरा म्हणाले, "बहुआयामी अजय नाईक यांच्या दिग्दर्शनाखालील आमचा पहिला चित्रपट जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही हॉस्टेलमधील आयुष्यावर बेतलेली गोष्ट आहे. ती १९९० च्या दशकात आकाराला येते. त्यावेळी मोबाईल फोन नव्हतेस्मार्ट फोन नव्हतेकेबल टीव्ही नव्हता की डिश टीव्ही नव्हता. इंटरनेट तर नव्हताच नव्हता. त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती. हॉस्टेलमधील आयुष्य त्यावेळी आता आहे त्याच्या कीतीतरी पट अधिक आकर्षक होते. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना येईल. हा संगीत चित्रपट त्यातील कर्णमधुर संगीतामुळे रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.