विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर हे कळाले कि, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबाव लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली. दुसरीकडे सरस्वतीच्या अचानक जाण्याने राघवने सगळ्यामधून मन काढून घेतले आहे. तो अचानक शांत झाला आहे, त्याचा कामामध्ये देखील रस उरलेला नाही. राघवच्या अशा वागण्याने देविका अस्वस्थ आहे. गावाच्या जवळच असलेल्या एका मंदिरामध्ये जाऊन राघवसाठी नवस बोलण्याची इच्छा देविकाने विद्युलला सांगितली. त्यासाठी राघव आणि देविका वाड्यामधून निघाले देखील, पण तिथे देविकाच्या समोर सरस्वती सारखीच दिसणारी दुर्गा नावाची मुलगी आली, तिला पाहून सरस्वती राघवच्या आयुष्यात परतणार या भीतीने ती राघवला पुन्हा वाड्यावर घेऊन गेली.
दुर्गा गावामध्ये तिच्या अक्का सोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असून तिचा आणि सरस्वतीचा काहीच संबंध नाही, तिने पहील्यांदाच सरस्वती नाव देवीकाच्या तोंडून ऐकले. मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्याप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा,असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. ही दुर्गा बाईक देखील चालवते तसेच संपूर्ण गाव या दुर्गाला घाबरत, अतिशय बिनधास्त स्वभावाची आहे. देविकाने विद्युलला या दुर्गाबद्दल सांगितल्यानंतर ती भुजंगला दुर्गाला वाड्यामध्ये घेऊन यायला सांगते. दुर्गा नक्की कोण आहे?दुर्गाच्या येण्याने वाड्यामध्ये आता नक्की काय घडणार आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहे.
आता सरस्वती सारख्याच दिसणाऱ्या दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच वाड्यामध्ये मज्जा, मस्ती आणि ड्रामा देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती ३० ऑक्टोबर संध्या. ७ वा. फक्त कलर्स मराठीवर.