Friday, September 15, 2017

पुणे महोत्सव पहायला विसरू नका ! !

                                                       संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला 'पुणे महोत्सव' ७ सप्टेंबर २०१७ ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे. मराठी इंडस्ट्रीतीलअनेक नामवंत कलाकारांच्या परफॉर्मन्स या कार्यक्रमात आहेत. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, सागर कारंडे , विशाखा सुभेदार , समीर चौगुले , मिलिंद शिंतरे , विजय पटवर्धन , मयुरेश पेम , प्राजक्ता माळी , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , रेशम प्रशांत आणिसंगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत . प्रेक्षकांचा रविवार मनोरंजित करण्यासाठीच झी युवा ही वाहिनी 'पुणे महोत्सव 'हा एक अतिशय उत्तम दर्जाचाकार्यक्रम घेऊन आलेली आहे.  

झी युवा च्या 'पुणे महोत्सव' चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या महोत्सवाच्यानिमित्ताने झी युवा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहे.  गुणवान युवतींचा ज्यांनीत्यांच्या आयुष्यात स्व कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावले अश्या प्रणिती शिंदे (तरुण महिलाराजकारणी), पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर ) , गौरी गाडगीळ ( कलाकार ) , ऋतुजा केकावळे ( विद्यार्थी ) , कृष्णा पाटील ( एव्हरेस्टवीर महिला गिर्यारोहक ) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यातआला आहे . रविवार १७ सप्टेंबर २०१७ ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता, झी युवावरमराठी कलाकाराच्या अदाकारीने रंगलेला आणि महाराष्ट्रातील गुणवान युवतींचा सन्मान सोहळापाहण्यासाठी पुणे महोत्सव हा कार्यक्रम पहायला विसरू नका.