Monday, May 29, 2017

'अनप्लग्ड मराठी लाईव्ह' ! BOLLYWOODBUBBLES.COM

चतुरस्त्र गायिका वैशाली सामंत शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होणार
'अनप्लग्ड मराठी लाईव्हही संगीत कार्यक्रमांची मालिका संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाणार
'अनप्लग्ड मराठी लाईव्ह' ही संगीत कार्यक्रमांची एक मालिका असून तिचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. या मालिकेची पहिली कडी मुंबईत माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे शुक्रवार दिनांक २ जून २०१७ रोजी रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदाबहार आवाजाची देणगी असलेली प्रख्यात गायिका वैशाली सामंत या पहिल्या वाहिल्या सत्रात सहभागी होत आहे. पावसाळ्यानंतर या मालिकेत या क्षेत्रातील अत्यंत प्रतिभाशाली कलाकार आपली अदाकारी सादर करणार आहेत. राज्याच्या इतर भागातील रसिक हे चांगल्यालोकप्रिय संगीपासून वंचित राहत आले आहेत. त्यांना 'अनप्लग्ड मराठी लाईव्ह'च्या माध्यमातून दर्जेदार संगीताचा आस्वाद आता घेता येईल.
वैशाली सामंत या त्यांची लोकप्रिय गाणी तर यावेळी सादर करणार आहेतचपण त्याचबरोबर अगदी पहिल्यांदाच काही नवीन गोष्टी दाखल करणार आहेत. रासिकंसाठी ही एक वेगळी मेजवानी असेल. त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्रही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांत गीतकार अश्विनी शेंडेगायक जयदीप बागवाडकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे ते प्रख्यात संगीतकार अविनाश-विश्वजीत यांचे सादरीकरण. ते यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करणार असलेल्या संगीताची झलक दाखवणार आहेत. मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन प्रख्यात संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर यांनी केले आहे.
या कॉन्सर्ट मालिकेचे आयोजन आर के स्वामी हंसा ग्रूपचा भाग असलेल्या हंसा इव्हेंन्ट्स करत आहे. देशातील काही सर्वात मोठ्या ब्रांडचा दशकभरचा अनुभव या माध्यमातून ही संस्था कार्यक्रमासाठी वपरणार आहे.
हंसा इव्हेंन्ट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख श्री सुजीत कुटे म्हणाले कीया कार्यक्रमाचे आयोजन मराठीत दर्जेदार मनोरंजन देण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. मराठीत अनप्लग्ड संगीत याआधी अनेक प्रकारांमध्ये सादर झाले असले तरी ते त्याच्या मूळ अवतारात कधीच सादर झाले नव्हते. या प्रकारामध्ये हलूवारसौम्यनैसर्गिक पद्धतीने गाणी सादर होतात आणि त्यात इलेक्ट्रॉनिक वाद्य वपरली जात नाहीत.
संगीत रसिकांना उत्तम संगीत अनुभव मिळावा म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञ यात सामील केले आहेत. या सर्वांनी अनेक बॉलीवुड आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये काम केले आहेअसेही ते म्हणाले.
'अनप्लग्ड मराठी लाईव्ह'च्या प्रवेशिका www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.