Saturday, October 27, 2012

`मोकळा श्वास' च्या एमपी-३ चे राज-शर्मिला यांच्या हस्ते शानदार प्रकाशन !

स्त्री- भ्रुण हत्येविरोधात आवाज उठविणाऱ्या 'मोकळा श्वास' या आगामी मराठी चित्रपटातील गाण्यांच्या 'एमपी-३' चे 'मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते एका शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील आवारात असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात रंगलेल्या या शानदार सोहळ्याला संगीतकार मिलिंद इंगळे, गायिका वैशाली सामंत, दिग्दर्शिका कांचन अधिकारी, 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' चे मंदार गुप्ते, राजन प्रभू, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, मृण्मयी देशपांडे, निर्माते भाऊसाहेब भोईर, सविता मालपेकर, श्याम मळेकर, संजय छाब्रिया, मानसी इंगळे आदी कलावंत उपस्थित होते.

'मोकळा श्वास चित्रपटातील गीते प्रसिद्ध कवी सौमित्र यांनी लिहीली असून ती संगीतकार मिलिंद इंगळे यांनी स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटात शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, मोहन जोशी, सुशांत शेलार, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, ऐश्वर्या तुपे, ज्योती सुभाष, आदी कलावंतांच्या लक्षणीय भूमिका आहेत.


 Posted By RASRAJ