'ई टीव्ही' मराठीवरील 'ढोलकीच्या तालावर' या यशस्वी रिऍलिटी शो ची टीम, दिग्दर्शक
संतोष कोल्हे, महाराष्ट्राची पहिली 'लावणी सम्राज्ञी' वैशाली जाधव, महावस्ताद, 'पानिपत'कार
विश्वास पाटील 'नजराणा लावणीचा' हा लावणीवर आधारीत आगळावेगळा बहारदार कार्यक्रम
रंगमंचावर घेऊन येत आहेत. मराठी रुपेरी पडद्यावरील बाई सुंदराबाई ते राम कदम यांच्या
लावणीचा प्रवास, पारंपारिक लावणीचा पेशवाईपासून आता पर्यंतचा प्रवास, २० वर्षात
मॉडर्न लावणीमध्ये झालेले प्रयोग अशा ३ टप्प्यात 'नजराणा लावणीचा' हा कार्यक्रम
रंगभूमीवर सादर होणार आहे.
'लॉजिकल थिंकर्स' आणि स्पेस डिझाईन' संस्थाच्या संयुक्त विद्यमाने 'नजराणा लावणीचा' कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोची पहिली विजेती 'लावणी सम्राज्ञी' वैशाली जाधव हे कार्यक्रमाची खास आकर्षण असून सोबत नृत्यांगणा गौरी जाधव, अमृता जोशी सह ३० कलाकारांचा भव्य संच या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 'नजराणा लावणीचा' हा कार्यक्रम लवकरच रंगमंचावर दाखल होणार आहे.