अ .भा.म .चित्रपट महामंडळातर्फे नुकतेच एक शिष्टमंडळ अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या अध्यक्षतेत सांस्कृतिक मंत्री श्री .संजय देवतळे यांना शासकीय विश्रामग्रह सह्याद्री या ठिकाणी जाऊन भेटले .
या भेटीत विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.त्यात प्रामुख्याने :-
१) शासना तर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदान योजने साठी विविध शिफारशी
२) अनुदानाची रक्कम ४० लाख रुपये व्हावी
३) पहिल्या चित्रपटाला अनुदान देण्यात यावे.
४) डीजीटल फॉरमयात चित्रपटाला सुधा अनुदान देण्यात यावे .
५) चित्रपटाचे अनुदान अ आणि ब वर्गात करावे .
६) अ वर्ग साठी ४० लाख रुपये ,ब वर्ग साठी ३० लाख रुपयांची तरतूद असावी .
७) अगोदर असणाऱ्या अनुदान योजनेतील क वर्ग रद्द करून सदर ब्यानर चालूच ठेवावा .
८) अनुदान परीक्षण समितीला चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरवीने शक्य व्हावे .
९) मराठी मलिकान साठी ५०% सवलतीची योजना कायम करावी व सदर निर्णय शक्य तेवढा लवकर घ्यावा .
१०) कोल्हापूर चित्र नगरी लवकरात लवकर सुरु करावी.
या आणि अशा विविध मागण्या ह्यावेळी करण्यात आल्या .
अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सविस्तर चर्चा घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
उत्तरादाखल मा.सांस्कृतिक मंत्री संजयजी देवतळे यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक विचार करी असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर चित्रनगरीचे वाल कम्पाउंड बांधले जात असल्याचे माहिती त्यांनी दिली .वाल कम्पाउंड चे काम पूर्ण झाल्या नंतर संपूर्ण चित्रपट सृष्ठीचे कोल्हापूर चित्रनगरीत स्वागतच आहे ,अशी प्रेमळ साद ना .देवतळे यांनी दिली .
सोबत सांकृतिक संचलनालय चे संचालक आशुतोष घोरपडे यांनीही शासनाचे सांस्कृतिक धोरण हे मराठी चित्रपटाला पूरकच असल्याचे सांगितले .
अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी महामंडळाच्या वतीने शासनाचे तसेच सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे आभार मानले .
यावेळी गोरेगाव फिल्म सिटी चे शाम तागडे ,कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील तसेच महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर ,सचिव सुभाष भुरके , संचालक विजय पाटकर,सह.सचिव संजीव नाईक ,अलका आठल्ये,,इम्तियाझ बारगीर, सतीश बिडकर,बाळकृष्ण बारामती उपस्थित होते .तसेच शिष्ट मंडळात प्रामुख्याने डॉ. जब्बार पटेल , अमोल पालेकर,चंद्रकांत कुलकर्णी ,सुमित्रा भावे ,सुनील सुखटणकर, समीर आठल्ये ,रमेश साळगावकर ,मोहन परब, अविनाश व ऐश्वर्या नारकर ,प्रकाश भालेकर,अर्चना नेवरेकर, गजेंद्र आहिरे ,कांचन अधिकारी, तृप्ती भोईर ,अमृता राव ,नितीन दातार आदी मान्यवर उपस्थित होते .
Posted By RASRAJ
Posted By RASRAJ